मुख्यमंत्र्यचा मुलगा म्हणून जेव्हा रितेश देशमुख जेनेलियाला पहिल्यांदा भेटतो… - Mahendra Patil

Mahendra Patil

It's Only Collection that I Liked! Nothing My own! In this blog you get all types of Marathi Poems like Marathi Prem Kavita, Miss You Kavita, Ek Tarfi Prem Kavita, Marathi Sad Love Poems, Virah Kavita, Lonely Marathi Poems, Need You Marathi Poems n all.... Collection of more than 100 Marathi Poems Kavita. Thank You For Visiting!!!!!! *Mahendra Patil*

Patiljee

Post Top Ad

New Post

Saturday, October 28, 2017

मुख्यमंत्र्यचा मुलगा म्हणून जेव्हा रितेश देशमुख जेनेलियाला पहिल्यांदा भेटतो…



मुख्यमंत्र्यचा मुलगा म्हणून जेव्हा रितेश देशमुख जेनेलियाला पहिल्यांदा भेटतो…

बॉलिवूड आणि हॉलिवूड अशा दोघांचा मेळ साधत रितेश नेहमीच मराठी चित्रपटांनाही न्याय देतो.दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा म्हणून सिनेमात आलेल्या रितेशने’तुझे मेरी कसम’या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली.या पहिल्याच चित्रपटात रितेशला त्याची जीवनसंगिनी भेटली ती म्हणजे जेनेलिया.तब्बल 10 वर्षे रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर रितेश आणि जेनेलियाने लग्न केले आणि त्यांच्या फॅन्सच्या आनंदावर पारावर उरला नाही.रितेश आणि जेनेलियाची जोडी बॉलिवूडमधील एक बेस्ट कपल म्हणून ओळखले जाते.आज या दोघांची खास प्रेमकथा तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.


एअरपोर्टवर झाली होती पहिली भेट..

रितेश आणि जेनेलियाची भेट हैदराबाद एअरपोर्टवर झाली होती.यावेळी 16 वर्षीय जेनेलिया तिच्या आईसोबत होती.मुख्यमंत्र्याचा मुलगा म्हटल्यावर त्याच्यात फारच अॅटीट्युड असणार असे जेनेलियाला वाटत होते त्यामुळे जेव्हा रितेश आला आणि त्याने जेनेलियासोबत हातमिळवणी केली त्याच्यानंतर तीने अगोदरच त्याला अॅटीट्युड द्यायला सुरुवात केली.रितेशला जेनेलिया ऑकवर्ड असल्याचे वाटले पण जेनेलियाच्या आईसमोर अतिशय नम्रपणे रितेश वागत होता.त्यानंतर सेटवरच्या लोकांशीही रितेशचे वागणेबोलणे पाहून जेनेलियाला त्याच्या चांगल्या स्वभावाची ओळख पटली आणि त्याच्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली.


चित्रटपटाच्या शूटिंगनिमित्त एकत्र घालवायचे वेळ..

रितेश आणि जेनेलियाने तुझे मेरी कसम या चित्रपटाचे संपूर्ण शूटिंग हैदराबाद येथे केले.शूटिंग पूर्ण झाल्यावर रितेश जेव्हा मुंबईत परतला तेव्हा त्याला आणि जेनेलिया एकमेकांना मिस करु लागले आणि त्यांचे एकमेकांसोबत फोनवर बोलणे चालु केले.यानंतर हे दोघे एकमेकांच्या प्रेमात कधी पडले ते त्यांनाच समजले नाही त्यामुळे एकमेकांना कोणी प्रपोज केले हे त्यांना अजूनही लक्षात नाही.दोघे एकमेकांना भेटायचा नेहमी कारण शोधत आणि सोबत वेळ घालवत.


रितेशला लवकर करायचे होते लग्न पण वडिलांचा होता विरोध..
रितेशचे वडील दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे महाराष्ट्रातच्या राजकारणाचे एक मोठे नाव होते.रितेश हिंदू आहे तर जेनेलिया ख्रिश्चन आहे.विलासरावांनी प्रथम या लग्नाला विरोध केला पण कालांतराने रितेशने त्याच्या घरच्यांची संमती मिळवसी आणि जेनेलिया डिसूजाची जेनेलिया देशमुख झाली.


रितेश-जेनेलिया अडकले विवाहबंधनात..
रितेश आणि जेनेलियाने 3 फेब्रुवारी 2012 रोजी लग्न करण्याचा निर्णय घेतला.दोघे दोन वेळा विवाहबंघनात अडकले.त्यांचे कारण म्हणजे,जेनेलिया ख्रिश्चन आहे आणि रितेश हिंदू.त्यामुळे दोघांनी हिंदू आणि ख्रिश्चन या दोन्ही पद्धतीने विवाह थाटला.


लग्नाच्या दोन वर्षानंतर बनली आई..
रितेश आणि जेनेलियाने लग्नाच्या दोन वर्षानंतर आई-बाबा बनले.जेनेलियाने 25 नोव्हेंबर 2014 रोजी रियान या त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म दिला त्यानंतर लगेचच दुसऱ्या बाळालाही जन्म देत 1 जून 2016 रोजी रितेश जेनेलिया पुन्हा आईबाबा बनले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here