...........आदर्श बायको................ - Mahendra Patil

Mahendra Patil

It's Only Collection that I Liked! Nothing My own! In this blog you get all types of Marathi Poems like Marathi Prem Kavita, Miss You Kavita, Ek Tarfi Prem Kavita, Marathi Sad Love Poems, Virah Kavita, Lonely Marathi Poems, Need You Marathi Poems n all.... Collection of more than 100 Marathi Poems Kavita. Thank You For Visiting!!!!!! *Mahendra Patil*

Patiljee

Post Top Ad

New Post

Wednesday, October 25, 2017

...........आदर्श बायको................

'बायको नोकरी करणारी असावी, ती स्मार्ट
असावी, चारचौघींत उठून दिसावी' अशी तमाम
नवरेमंडळींची इच्छा असते. यासोबत तिने
'गृहकृत्यदक्ष' आणि 'आदर्श सून' असणंही मस्ट असतं.
पण, तीही आपल्यासारखी एक माणूस आहे.
तिच्या भावभावना, इच्छा-आकांक्षा,
तिची परिस्थिती कशी असू शकते, याकडे मात्र
या नवरेलोकांचं दुर्लक्ष होतं. नवऱ्याचा बायकोकडे
पाहण्याचा दृष्टिकोन कसा असावा, त्याबद्दल
केलेली एक समीक्षा ........
- उद्या कदाचित तुझं
नोकरी करणाऱ्या मुलीशी लग्न होईल.
त्यावेळी जरा हे वास्तवही लक्षात घे.
- ती तुझ्याएवढीच शिकलेली असेल. तुझ्याएवढाच


पगार कमावत असेल.
- तीदेखील तुझ्यासारखीच व्यक्ती असेल, त्यामुळे
तिचीही स्वप्नं असतील, आवडी असतील,
- तिनेही आतापर्यंत कधीच किचनमध्ये पाऊल
टाकलं नसेल, अगदी तुझ्यासारखंच
किंवा तुझ्या बहिणीसारखं...
- तीसुद्धा अभ्यासात बिझी असेल
आणि मुलगी म्हणून कसलीही सवलत न
देणाऱ्या या स्पधेर्च्या युगात पुढे
जाण्यासाठी धडपडत असेल,
अगदी तुझ्यासारखीच!
- तिनेही तुझ्याप्रमाणेच वयाची २०-२५ वर्षं आई,
बाबा, बहीण, भाऊ
यांच्या प्रेमाच्या सान्निध्यात
घालवली असतील,
- आणि तरीही हे सारं मागे सोडून, तिचं घर,
प्रेमाची माणसं यांना दूर करून ती तुझं घरं, तुझं कुटुंब,
तुमच्या रितीभाती स्वीकारायला आली असेल.
- पहिल्याच दिवशी तिने मास्टर शेफप्रमाणे
स्वयंपाक करावा अशी सगळ्यांची अपेक्षा असेल,
- नेहमीच्या बेडवर तुम्ही डाराडूर झोपलेले
असताना ती मात्र
सर्वस्वी अनोळख्या असलेल्या वातावरणाशी,
अनुभवांशी आणि किचनशी जुळवून घेण्याचा प्रयत्न
करत असेल.
- सकाळी उठल्याबरोबर तिने चहाचा कप हातात
द्यावा आणि रात्रीचं जेवणही तिच्याच हातचं
असावं अशी अपेक्षा असेल,
- तिलाही ऑफिसच्या कामाच्या डेडलाइन
पाळताना उशीर होत असेल,
- तीसुद्धा कंटाळली असेल, कदाचित
तुमच्यापेक्षा थोडी जास्तच, तरीही तिने
तक्रारीचा सूर लावू नये असंच तुम्ही म्हणाल.
- नोकर, स्वयंपाकी, बायको...
यापैकी तिला एखादी भूमिका करायची नसली
- आणि त्यातही तुमच्या तिच्याकडून काय
अपेक्षा आहेत हेदेखील शिकण्याचा ती प्रयत्न करत
राहील...
- तीसुद्धा थकते, कंटाळते...
- पण सतत टुमणं लावू नये आणि तुझ्यापेक्षा पुढे
जाऊ नये या अपेक्षाही तिला माहिती असतात.
- तिचा स्वत:चा कंपू असतो, त्यात
मित्रंही असतात आणि तिच्या ऑफिसमधले पुरुष
सहकारीही... तरीही ईर्ष्या, अनावश्यक
स्पर्धा आणि असुरक्षिततेच्या भावनेने
तुमच्या मनात घर करू नये म्हणून
ती बालमित्रांपासूनही दूर राहते.
- कदाचित तिलाही लेट नाइट पाटीर्त जायला,
धमाल करायला आवडत असेल, पण
तुम्हाला आवडणार नाही म्हणून तू सांगितलेलं
नसतानाही ती तसं करत नाही.
- स्वत:कडून पूर्ण प्रयत्न करून ती हे नातं सुंदर करेल. तू
मदत केली आणि विश्वास ठेवला तर हे नातं
जीवनातलं सर्वाधिक यशस्वी शिखर गाठू शकेल.
- या अनोळखी घरात केवळ तू एकच
तिच्या ओळखीचा, जवळचा आहेस, त्यामुळे
तुझी मदत, संवेदना आणि सर्वात जास्त महत्त्वाचं
म्हणजे अण्डरस्टॅण्डिंग आणि प्रेम मिळावं,
अशी तिची अपेक्षा असेल.
पण अनेक जण हे समजूनच घेत नाहीत...

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here