दर वर्षी वांद्रे(पूर्व) रेल्वे स्टेशन लगतच्या 'गरीब नगर झोपडपट्टीला' लागणाऱ्या आगीमागे काय गौड"बंगाल" आहे ? दर वर्षी.... अगदी दर वर्षी किमान दोनदा वांद्रे(पूर्व) वासाहित 'गरीब नगर झोपडपट्टीला' आग लागते. नेहमी ही आग सायंकाळी किंवा रात्रीच्या वेळी लागते. रेल्वे प्रवासी भयभीत होऊन सैरावैरा पळतात, काल दुर्दैवाने एका प्रवाशाचा पळताना रेल्वे रुळांवर पडून मृत्यू झाला.पण येथील 'रहिवासी' मात्र शांतपणे मोकळ्या जागांवर जमा होतात. आग लागलेल्या २ ते ३ माळ्यांच्या झोपड्या राख होतात. अतिशय छोट्या अशा गल्ली-बोळांमुळेअग्निशमन दल, पोलिस किंवा रुग्णवाहिका आग लागलेल्या ठिकाणी पोहचू शकत नाहीत. मग टी.व्ही.कॅमेरे-पत्रकारांची छायाचित्र काढण्यासाठी लगबग सुरु होते. दरम्यान काही महिला मोक्याच्या ठिकाणी येऊन छाती बडवत भोकाड पसरतात, पत्रकारांनी काही विचारलं तर तोंड न उघडण्याची सक्त ताकीद त्यांना दिलेली असते.दुसऱ्या दिवशी वर्तमान पत्रांमध्ये हळहळ व्यक्त होते आणि नंतर .... नंतर काय ????जे तत्सम 'ग्रस्त' आगीमूळे बेघर झालेले असतात त्यांचे पुनर्वसन करा अशी काही लोकप्रतिनिधींकडून मागणी होते. त्यांना म्हाडा किंवा 'झोपू' योजनांद्वारे मुंबईत हक्काचं घर मिळतं. त्यांना नवीन पॅनकार्ड, निवडणूक कार्ड आणि आधार कार्ड एक दोन दिवसांत मिळतं.तसेच पुढच्याच आठवड्यात ज्या झोपड्या जळल्या होत्या तिथेच एक अजून मजला चढलेली टुमदार २ ते ३ माळ्यांची नवीन कोरी ताडपत्र्यांची झोपडी उभी रहाते. झोपडीत केबल टी.व्ही., फुकट मुबलक पाणी व वीज पुरवठा इ. सोयीसुविधा असतात. तेथेच वसलेल्या नवीन झोपड्यांत रहायला २००० 'नव-बेघरांची' पुढील बॅचचे आगमन होते. ह्या झोपड्या विकणे, भाड्यावर देणे या व्यवहारांसाठी 'ईस्टेट एजंट'ही असतात.बरं हे दरवर्षीचे 'आगग्रस्त बेघर' येतात तरी कुठून ..? ते हिंदी बोलत नाहीत, त्यांच्या भाषेत हलकासा बंगाली टोन असतो, तोंडात सदैव मावा-गुठका भरलेला असतो. त्यांचा पेहराव ते बांगलादेशीचं आहेत हे ओरडून ओरडून सांगत असतो.प्रश्न असा, हिंदुस्थानातील कष्टकरी गिरणीकामगार असो वा दुष्काळग्रस्त/ गारपीटग्रस्त शेतकरी, धरणग्रस्त/अणुप्रकल्पग्रस्तस्थानिक आणि आता तर दिघ्यातील स्थानिक मराठी माणूस यांच्या पुनर्वसनासाठी (वर्ष अपुरी पडतात) आणि त्यांच्या स्वरक्षणासाठी आनेक युगं लागतात. त्यांच्या पिढ्यान-पिढ्या हालाखीत खितपत पडलेल्या असतात पण या बांगलादेशींना हिंदुस्थानात मिळणाऱ्या रेडकार्पेट वागणुकीबद्दल कोणी आवाज उठविला तर धर्मनिरपेक्षतेवर घाला असल्याची ओरड सुरु होते. हे व्होटबँक पोलिटिक्स नाही तर काय आहे ??
मित्रांनो, जमेल तेवढा हा लेख पसरवा
खरच जनजागृती ही झालीच पाहिजे🙏
No comments:
Post a Comment