दुर दुर चालली आज माझी सावली
आजपासुन ठिक 1 वर्षानंतर माझ्या शोनाचं लग्न आहे पण मी खुश आहे कारण प्यार सिर्फ पाने का नाम नहीँ होता
तिच्या बरोबर घालवलेला प्रत्येक क्षण मी ह्रदयाच्या कपाटात जपुन ठेवलाय
आज पासुन ठिक ३ वर्षा पुर्वी आमची Fb च्या एका Post वर झाली झाली एका मित्राच्या पोस्टवर कमेँटच्या रूपात
मी तिला रिक्वेस्ट पाठवणार होतो पण माझी रिक्वेस्ट ब्लॉक होती
पण म्हणतात ना किसी चीज को अगर सच्चे दिल से चाहोँ तो पुरी कायनात तुम्हेँ उससे मिलाने मेँ जुट जाती है
तसच काहीतरी माझ्या बाबतीत झालं
दुसर्याच दिवशी समोरून तिची रिक्वेस्ट आली आणि मी
क्षणाचा ही विलंब न लावता ती Accept केली
मग चॅटिँग सुरू झाली
एक महिण्याच्या आतचं एकमेकांच्या खुप क्लोज झालो
एकमेकांला चिडवण जोक बनवणं
त्यातुनच मी तुझीच रे ची संकल्पना डोक्यात आली नी आम्ही हे पेज बनवलं
पण माहित नव्हत हेच पेज आमच्या प्रेमाचा मुलभुत पाया ठरेलं
ती मला आवडायला लागलेली पण प्रपोज करणार कसा दोघ बेस्ट फ्रेँड होतो
प्रपोज केला तर मी तिला गमवेल याची भिती माझ्या मनात होती
पण सगळ्या फेसबुकला ( आमाचा ग्रुप ) वाटत होत की आम्ही दोघ Couple आहोत
पहिला वेलेँटाईन गेला
दुसराही वेलेंटाईन निघुन गेला त्यानंतर जुन मध्ये मी तिला प्रपोज केलं ( कदाचित तिच्याही मनात माझ्या बद्दल त्याच भावना असतील ) तिने क्षणाचाही विलंब न लावता माझं प्रपोजल स्विकारलं
त्या नंतर आमच्या प्रेमाची गाडी फेसबुक च्या रूळावर Arijit च्या गाण्यांबरोबर धावु
लागली
प्रेमात भांडणेही होतात आमच्यात ही झाली
कधी तिने संभाळुन घेतल कधी मी
खुप भांडण झाल्यानंतर ही ज्यांच्यात ब्रेक अप होत नाही त्याला खरं प्रेम म्हणतात
फोनवर तासनतास बोलणे, सकाळची मॉर्निँग विश लाईफ फुल्ल ऑसम्
पण म्हणतात ना दिवस चांगले असो किंवा वाईट फार काळ टिकत नाहित तेच झालं
तिला स्थळ सांगुन यायला लागली
कसे बसे तिने दोन स्थळांना नकार दिला कारण आम्ही खुप स्वप्न रंगवलेली
दोघांच हक्काच घर असेल
मी जॉबला जाणार तिही जॉब करणार
मला तिने जॉब केलेला नाही आवडणार पण ती बोलते संसार हा गाडिची दोन चाक आहेत
एकाने पिठाची सोय केली तर दुसर्याने मिठाची सोय करायला हवी
आमची दोन मुल असतील
एक स्वतःच नी एक अनाथ आश्रमातुन दत्तक घेतलेल
मुलांची नांव ही ठेवलेली
मुलगी वेदिका नी मुलगा यश
पण स्वप्नांना ग्रहण लागलं
आमच्यात एक खुप मोठं भांडण झालं नी रागाच्या भरात तिने एका स्थळाला होकार दिला
संपलं..
तिला तिच्या चुकिचा पश्चाताप झाला तोपर्यँत खुप वेळ निघुन गेलेली
फेब्रुवारी मध्ये तिच लग्न आहेँ
पण
मी करेल तिच स्वप्न पुर्ण
माझी ही दोन मुल असतील एक स्वतःच नी एक Adopted. कारण ते स्वप्न फक्त तिच्या एकटीच नव्हत
माझं ही होतं
मी Happy आहे कारण मी कधी तिच्या शरिरावर कधी प्रेम केलच नाही
मी प्रेम केल तिच्या स्वज्वळ मनावर
तिने सांगितलय, " ए बावळ्या मी फक्त तुझीच आहे रे, शरिराने नसले तरी मनात फक्त तुच आहेस
नी पुढचा जन्म फक्त तुझ्याच साठी असेल
#NoSharring हा " :-)
तेरी साँसोँ की सासोँ मेँ
जो हूँ तो मैँ हूँ
तेरे होने से हि मेरा होना है
तुझ को खोना जैसे खुद को खोना है
तु जो है तो मैँ हूँ
यु जो है तो मैँ हूँ
No comments:
Post a Comment