Love _ Sex _ गर्भनिरोधक गोळ्या - Mahendra Patil

Mahendra Patil

It's Only Collection that I Liked! Nothing My own! In this blog you get all types of Marathi Poems like Marathi Prem Kavita, Miss You Kavita, Ek Tarfi Prem Kavita, Marathi Sad Love Poems, Virah Kavita, Lonely Marathi Poems, Need You Marathi Poems n all.... Collection of more than 100 Marathi Poems Kavita. Thank You For Visiting!!!!!! *Mahendra Patil*

Patiljee

Post Top Ad

New Post

Wednesday, November 22, 2017

Love _ Sex _ गर्भनिरोधक गोळ्या




त्याने 11 वी लाच प्रपोज केलेले . पण मी त्याला हो म्हटले नाही . हो म्हटले नाही म्हणजे तो मला आवडायचा नाही असे नाही. मलाही तो आवडायचा.
१२ वी झाली, कालांतराने आमच्या दोघांचाही एकाच इंजिनियरींग college ला नंबर लागला. योगायोग असा की faculty सुध्दा एक व class सुध्दा एक.
जसे जसे शरीर वाढत होते तसतसे आता हळूहळू दोघातले बोलणे वाढले , संपर्क वाढला , जवळीक वाढली. मी जाणीवपूर्वक त्याला आता माझा होकार दर्शविला. प्रेमाच्या शपथा - आणाबाका घालून झाल्या . लग्नाची वचन देवून झाली.


माझ्या होकाराने त्याला आता माझ्या शरीराला व मला त्याच्या शरीराला हात लावण्याची रितसर हक्क मिळाला. शरीरातील अवयवांत जसजसा chemical बदल होत गेला तसतशी आमच्यातील chemistry बदलली. आता आम्ही सोबत फिरायचो, बाईक शेअर करायचो , corner seats घेवून movies ला जायचो. हातात हात घेणे, मिठी मारणे , किस करणे हे आता आम्हाला रोजचेच होते. आता आमच्या दोघांची शरीरं आम्हाला याहून वेगळं काहीतरी थ्रील मांगत होती.
साहजिकच त्याचाच whatsapp ला message आला ....
" येतेस का आज रात्री रूमवर ? "
मीही थोडासा नकार देत शेवटी होकार दर्शविला. मलाही whatsapp ला केलाला phone_sex , practically अनुभवायचा होता. आम्ही condoms चा वापर करून त्या रात्री इंटरकोर्स केला. अशा पध्दतीने आमच्या कितीतरी रात्री गेल्या.
एक दिवस मात्र भावणेच्या भरात वाहवत condom नं वापरताच इंटरकोर्स केला . दोघांच्याही शरीराची आग शांत होईपर्यंत काही लक्षात आले नाही . नंतर चूक जाणवली. मी लगेचच दुसऱ्या दिवशी सकाळीच गर्भनिरोधक गोळी घेतली. तो बोलत होता. काही होत नाही , घाबरू नकोस . पण मला MC (पाळी) येईपर्यंत भिती वाटतच होती. एकदाची पाळी आली . व गर्भनिरोधक गोळ्यांवर डोळेलावून विश्वास बसला.
आता आम्ही without Condoms इंटरकोर्स करायला लागलो . कारण त्यात जास्त आनंद मिळायचा. Sex नंतर किंवा आधी एक गोळी घ्यायची आणि बिंधास्त राहायचं. 

आमची दोघांच्या सहवासातली इंजिनियरींची ४ वर्षे आणि ME ची २ वर्षे अशीच एकमेकांच्या शरीराची भूक भागवत
sex व गर्भनिरोधक गोळ्यांच्या सहवासात , प्रेमाच्या आधुनिकीकरणात निघून गेली.
शपथा घेतल्या , त्याप्रमाणे लग्नही केलीत.
आता मात्र आमच्यातील शारीरिक संबंधांना समाजमान्य लायसन्स मिळालं.
परंतु परत family planning च्या नावाखाली गर्भनिरोधक गोळ्या ह्या college च्या bag पासून लग्नानंतर ही सोबतच होत्या.
आता लग्नाला 2 - 3 वर्षे होऊन गेली होती. घरच्या मोठ्यांना बाळाचा आवाज ऐकायचा होता.
आम्ही दोघांनी खूप प्रयत्न करूनही गर्भधारणा होत नव्हती . शेवटी doctor चा सल्ला घेतला , चेकअप केले .
doctor चे reports आले --
मी कधीही आई होनार नव्हते . Sex च्या दुनियेत मनसोक्त वावरताना याची मला जराही कल्पना नव्हती.
आता मला बाळंतपणाच्या नाहीत तर वांझोटोपणाच्या कळा येत होत्या. पोटातील गर्भपिशवीच काढून टाकावी लागणार होती.

मला थोडीही कल्पना नव्हती--
"क्षणिक चांबड्याच्या सुखासाठी नकोत्या वयात नको त्या वैज्ञानिक सुखसुविधांचा उपयोग घेऊन मी वांझोटेपणाला माझ्या गर्भात वाढवत असल्याची. "

Writer - सुधीर त्र्यें. पाटील

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here