बॉलिवूडमध्ये सुपर-डूपर हिट ठरलेल्या ‘बाहुबली 2’ मधील दाक्षिणात्य अभिनेत्री अनुष्का शेट्टीचा आज 36 वा वाढदिवस आहे. ‘बाहुबली’ सिनेमामुळे अनुष्काचे आता केवळ दक्षिण भारतातच नव्हे, तर संपूर्ण देशभरात चाहते आहेत.
अनुष्काच्या वाढत्या लोकप्रियेमुळे तिच्याबाबत रोज नवनवीन बातम्या येत असतात. नुकतंच या दोघांचं लग्न ठरलं असून, डिसेंबरमध्ये साखरपुडा असल्याची बातमी आली होती.
वास्तविक, अनुष्का शेट्टीचं खरं नाव स्विटी शेट्टी आहे. तिचं सौंदर्य पाहून एका दिग्दर्शकाने तिला सिनेमाची ऑफर दिली. यानंतर 2005 मध्ये तिने ‘सुपर’ या तामिळ सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. वास्तविक, तिच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तचा सिनेसृष्टीशी संबंध नाही, पण आज ती टॉलिवूडमधील सर्वोत यशस्वी अभिनेत्री म्हणून गणली जाते.
सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी ती मंगळुरुमध्ये एक योगा इंस्ट्रक्टर म्हणून काम करत असे.
तिचा ‘साईज झिरो’ हा सिनेमा सर्वात लोकप्रिय ठरला. या सिनेमासाठी तिने तब्बल 20 किलो वजन वाढवलं होतं. शिवाय ती इंटेक्स अक्वा स्मार्टफोनची ब्राँड अम्बॅसेडर आहे.
2010 मध्ये तिचा तामिळ ‘सिंघम’ सिनेमा सर्वात लोकप्रिय ठरला. यानंतर 2013 मध्ये या सिनेमाचा स्क्वेल प्रदर्शित झाला. यातही ती मुख्य भूमिकेत होती.
2009 मध्ये आलेल्या ‘बिल्ला’ सिनेमामध्ये अनुष्का आणि प्रभास ही जोडी प्रेक्षकांना पहिल्यांदा पाहायला मिळाली. या सिनेमातील अनुष्काचं काम पाहून प्रभास तिचा चाहता बनला.
या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान दोघांची जवळीक वाढल्याने यांच्या अफेअरची जोरदार चर्चा होती. कारण, त्यावेळी टॉलिवूडमध्ये प्रभास सर्वात यशस्वी अभिनेता होता. तर अनुष्काची टॉलिवूडमध्ये सुरुवात होती.
या सिनेमानंतर प्रभास आणि अनुष्काही जोडी अनेक मुलाखती आणि सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र दिसू लागल्याने, दोघांच्या लग्नाची जोरदार चर्चा होती. या दोघांमध्ये तीन वर्ष अफेअर सुरु होतं. पण त्यानंतर दोघांचं ब्रेकअप झालं.
‘बाहुबली’ सिनेमाच्या निमित्ताने ही जोडी पुन्हा एकदा एकत्रित आली. त्यावेळी प्रभासच्या लग्नाची चर्चा पुन्हा सुरु झाली. या दोघांचंही लग्न ठरलं असून, डिसेंबरमध्ये साखरपुडा असल्याचा गौप्यस्फोट एका दिग्दर्शकाने केला होता. पण अद्याप प्रभासकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. जर ही रिल जोडी रिअल लाईफमध्ये आल्यास, दोघांच्याही चाहत्यांना मोठा आनंद होईल. (सर्व फोटो : अनुष्का शेट्टी ट्विटर अकाऊंट)









No comments:
Post a Comment