कुणीतरी सांगीतल की गेले २ महिने तो खुप आजारी आहे. मनात नको नको ते विचार येऊ लागले. मुली ला शाळेत सोडायला गेले आणि शाळेतच हरवुन गेले. जवळपास १० वर्ष झाली या गोष्टी ला.
आमच्या कॅालेज मधला सर्वात टपोरी मुलगा तो. सारे टवाळक्या करणारे ढ़ मुल त्याच्या सोबत असायची. जेव्हा जेव्हा कॅालेज मध्ये मुलींसाठी भांडण होयच नेहमी तो पुढे असायचा. बाकीच्या मुलांचे कॅालेजच्या मुलींसोबत अफेर सुरु असायचे. कॅालेज कोण नवीन मुलगी आली की साऱ्यांची नजर त्यांच्यावर पडायच्या. मग अनेक मार्गांनी तिला आपल्या जाळ्यात ओढत नाही तो पर्यंत ते शांत बसायचे नाही. एखादी मुलगी नकार देत असेल तर तिच्या सायकल ची हवा सोड, गाडीच्या सीट चे कवर फाडा असला त्रास सुरू व्हायचा. पण…..
तो कधी कोणत्या मुली सोबत बोलताना पाहीला नव्हता. विसकटलेले केस, धडधड करत गाव जागवणारी त्याची बुलेट, लाल व काळ्या रंगाचा चेक्स चा शर्ट, गोल चेहरा, लहान डोळे, उंची मध्यम. माझी परिक्षा जवळ आली आणि माझे हाॅल टिकीट कुठेतरी पडल. कुणीतरी सांगितल की त्याला जाऊन भेट, तो काढेल पर्याय. पर्याय उरला नाही म्हणुन त्याला जाऊन भेटले. खुपच आदर दिला त्याने, बोला की काळजी करु नका उद्या पर्यंत शोधु. मला तर आशाच वाटत नव्हती ते मिळेल की नाही याची.
पण दुसऱ्या दिवशी लेक्चर सुरू असताना तो आला, सर्वांन देखतच त्याने माझे हॅाल टिकीट मला दिले. माझे धन्यवाद बोलायचेही धाडस झाले नाही, पण मन जिंकल त्याने. कॅालेजच्या मुलांच्या घोळक्यात माझी नजर त्याला शोधायची आणि तो नजरेस पडल्यावर काळजात धस्स्स ह्वायचं. इतक्या मुली सोबत असायच्या पण त्याला स्माईल दिल्याशिवाय पुढे नाही जायचे.
एक दिवस पाऊस खुप पडत असताना मी थांबले होते बस स्टॅाप वर, तो आला बुलेट घेऊन. भिजत मला बोल्ला “चल”. मी म्हणले “कुठे, चल” कशाला काही नाही विचारता बसले त्याच्या बाईक वर. आणि बस त्यावेळी त्याच्या बाईक वरीन चिंब भिजली. नंतर हळु हळु असेच विना कारणांचे भेटत गेलो, एकमेकांसोबत वेळ घालवायला लागलो. एकमेकांना प्रपोज न करता आम्ही एकमेकांचे कसे झालो हे तेव्हा कळलेच नाही. माझ्या प्रेमाची भेट म्हणुन त्याला दिलेल माझ्या नावाच लॅाकेट तो नेहमी घालायचा. खुप छान जीवन सुरु होत. आम्ही लग्नच करायच ठरवल पण…..
माझ्याच घरच्यांनी नकार दिला. बोल्ले “त्याच्याशी लग्न करुन देण्यापेक्षा टोक्यात दगड घालुन नदीत ढकलुन देऊ तुला” खुप रडले मी. अखेर वडिलांच्या अश्रुंपुढे हतबल झाले. त्याला पळुन जाऊ अस सांगुनही मी दुसऱ्याशी लग्न केल. परत हजार वेळा त्याची चौकशी केली, काळल की दिवस रात्र दारु च्या नशेत असतो. घरच्यांनी त्याला बघायच सोडुन दिलय, सकाळी दारु पिऊन कुठेतरी पडतो म्हणे..
बिचाऱ्याने मला विसरायला दारुचा आश्रय घेतला, पण कधी माझ्या आयुष्यात ढवळाढवळ केली नाही. मनात आल असत तर तो मला इथुन पळवुन नेऊ शकला असता आणि मी ही सुद्धा आयुष्यभर त्याची रखेल म्हणुन जगले असते. ज्या ज्या वेळी गावी जाइन त्या त्या वेळी त्याला रस्त्याबाजुला दारु पिऊन पडलेला पहायचे तेव्हा काळजात बाण घुसायचा. काळ ढिप्प पडलेला त्याच शरीर, घाणेरडे कपडे. काय तरारा होता त्याचा एके काळी.
डोळ्यात आलेल पाणी पुसत निर्धाराने ती उटली. मुलीला वर्गातुन घेउन तटकन तिने घर गाठल आणि नवऱ्याला फोन करुन करुन सांगितल की अचानक गावी जाते. मुलीला शेजारी ठेवली, दोन च्या ट्रेन सरळ गाव गाठल. आज त्याला काही झाल तरी नक्की भेटनार, त्या एक घट्ट मिठी मारणार, त्याच्या आवडीचा मोगऱ्याचा गजरा सुद्धा घातला. गावी आल्यावर भरभर चालत त्याच्या घराकडे निघाले, सारा गाव शांत होता, त्याच्या घरासमोर काही माणसे दिसली…
सार काही संपल होत, तो सकाळीच हे जग सोडुन गेला होता, त्याला दहन देऊन लोक येत होते, ती धावत स्मशानात पोहचली तो पर्यंत चिता शांत झाली होती. साऱ्या देहाची राख झाली होती, पण अश्या राखेत काहीतरी चमकल, ती चमकलेली वस्तु बाजुला घेतली आणि त्या वस्तुला बघताच डोळ्यांतुन अश्रुंचा धबधबा सुरू झाला. दहा वर्षां पुर्वी माझ्या नावाच मी दिलेल लॅाकेट अखेर पर्यंत त्याने ते गळ्यात ठेवल होत….
तिने तिथेच त्या लॉकेट ला ओठावर लावले आणि ढसाढसा रडू लागली होती पण...आता वेळ सुद्धा निघून गेली होती....



No comments:
Post a Comment