सैराटमुळे लोकप्रियतेच्या शिगेला पोहोचलेली आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू हि सध्या एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेती रिंकू सगळ्याच माध्यमात लोकप्रिय आहे. पण वॉट्सऍप आणि फेसबुकच्या जगात कोणाला केव्हा उचलून धरण्यात येईल सांगता येत नाही. सोशल मीडियावर अनेक गोष्टी वायरल होतात. यामुळेच आर्ची पुन्हा एकदा वृत्तात आली आहे. याचं कारण तिचा एखादा चित्रपट किंवा भूमिका नक्कीच नाहीये. तर एका व्हिडिओ मुळे तिच्याबबद्दल अनेक चर्चा रंगत आहेत. वायरल झालेल्या या व्हिडिओ मध्ये आर्ची नाचता नाचता पाय सरकून पडताना दिसत आहे. ती पडते तेव्हा आर्चीच्या चाहत्यांच्या काळजाचा ठोकाच चुकतो. आणि सेटवर असलेल्यांचीही धांदल उडाली. पण ती मुलगी नक्की आर्चीच आहे का याकडे कोणाचं लक्षच नाही! ती भले आर्चीच्या चेहऱ्यामोहऱ्याची असली तरी रिंकू नक्की कोणतं चित्रीकरण करते आहे का याची सध्या तरी माहिती नाही. पण ती आर्ची समजूनच ‘आर्ची सांडली रे’ अशी बोंब सोशल मीडियावर ठोकण्यात आली. ती खरं तर आर्ची नसून दाक्षिणात्य चित्रपटातील दुसरीच अभिनेत्री असल्याचं उघडकीस आलं आहे. त्या सिनेमाच्या दिग्दर्शकांनी स्वतः हि माहिती दिली आहे. त्यामुळे नेटकरांनो ती ‘आर्ची’ नव्हे!

No comments:
Post a Comment