असं म्हणतात लग्नानंतर फक्त मुलींनाच adjust करावं लागतं, पण एका मुलाच्या आयुष्यात लग्नानंतर काय बदल घडतात, ते लिहायचा प्रयत्न केला आहे. सगळंच स्वानुभव आहे असं नाहीए पण थोडं स्वतःच आणि थोडं आजू बाजूचं बघून लिहिलंय. वाचून काय वाटलं ते कळवावे. धन्यवाद !!!
मान्य आहे माझ्यासाठी घर दार ओलांडून आलीस, कदाचित चार लोकांशी तू माझासाठी भांडून आलीस, तुझे अस्तित्व माझासाठी तू म्हणतेस तू विसरून आलीस, माझ्यासाठी आवडी-निवडी स्वतःच्या तू ठेऊन आलीस तुझासाठी मी मात्र काहीच का गं केलं नाही ?
संसारासाठी आपल्या या मी काहीच का गं झेललं नाही ? लग्न करून तुला बघ एक ऐवजी दोन घर मिळाले, मला मात्र माझ्याच घरात सोंगाड्याचे सोंग मिळाले, आई-बाप तुला चार आणि माझे मात्र माझ्यापासून दूर झाले, तुझ्याखातर adjust करताना तू आधी, ते second choice झाले, बहीण माझी खुश, तिला मैत्रीण मिळाली, तुलाही नव्या घरी आयती बहीण मिळाली, मला मात्र तिची आता गाठभेट अवघड झाली, तिचा वाटणीचा वेळ तुला देणं ही गरज झाल,
एकटा होतो तेव्हा मनसोक्त मित्रांसोबत भटकणं व्हायचं, आता मात्र weekend ला फक्त नातेवाईकांकडे जायचं, जबाबदारी तर सखे विचारूच नको, जबाबदारी घराची, तुझी आणि माझ्या नावाने वाढणाऱ्या ‘तुझ्या’ रक्ताची, जबाबदारी त्या सर्व सख्या-सोयऱ्यांची कालपर्यंत जी नाती नव्हती परिचयाची, जबाबदारी ‘नवरा’ म्हणून तुला प्रतिष्ठा देण्याची तुला जपण्याची, तुझं मन रमवण्याची, लग्न करून खरं म्हणजे तुला सर्वच double मिळालं, मी मात्र तुझ्यावरचं प्रेमाखातर स्वतःलाही गमावलंय.…
वाचून वाटेल तुला काही कदाचित, खंत आहे मला या सगळ्याची, खरं सांगायचं तर कदाचित यातच मजा आहे जगण्याची आपण कोणासाठी, कोणी आपल्यासाठी आहे, गरज आपली कोणालातरी असणे यातच सुख आहे, हा विश्वासच माझ्या कष्टांना बळ देत जातो, तुझ्यासाठी सर्व adjust, स्वखुषीनेच मी रोज करत जातो…
Mahendra Gurunath Patil
Aware, Uran Raigad
Mahendra Gurunath Patil
Aware, Uran Raigad


No comments:
Post a Comment